Video – वानखेडे स्टेडियममध्ये हजारोंच्या उपस्थितीत साजरा झाला सचिन तेंडुलकरचा वाढदिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येत्या 24 एप्रिलला त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सचिनसाठी एक मोठा केक आणण्यात आला होता. वानखेडे स्टेडियमवर उपस्थित हजारो चाहत्यांनी त्याच्यासाठी वाढदिवसाचे गाणे गायले व शुभेच्छा दिल्या. त्याच्या या वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्टेडियममध्ये सर्व प्रेक्षकांना सचिनच्या चेहऱ्याचे मास्क वाटण्यात आले होते. तसेच प्रत्येक चाहता हा ओरडून सचिन पर्यंत त्याच्या शुभेच्छा पोहचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे स्टेडियममधील संपूर्ण वातावरण सचिनमय झालं होतं.