नोकरीच्या पाचव्या दिवशीच मारला डल्ला 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेशर वेसल (अवजड मालवाहू जहाज) चे स्पेअर पार्ट बनवण्याच्या कारखान्यातून मोटर पंप चोरीचा प्रयत्न करणाऱया चौघांना सहार पोलिसांनी अटक केली. राजेंद्रप्रसाद मिश्रा, राजू निसार, अर्जुन निसार, मुख्तार शेख अशी त्याची नावे आहे. नोकरीच्या पाचव्या दिवशीच या चौघांनी डल्ला मारला. न्यायालयाने चौघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे व्यावसायिक असून त्याचा अंधेरीच्या चिमटपाडा येथे मालवाहू जहाजाचे स्पेअर पार्ट बनवण्याचा कारखाना आहे.