
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सलग दुसऱ्यांदा बाजी मारली, तर विष्णू सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील निर्भीड पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांनी विजय मिळवला, तर कार्यवाहपदी शैलेंद्र शिर्पे यांची निवड झाली.
पत्रकार संघाच्या आझाद मैदान येथील कार्यालयात शनिवारी खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली. मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली. त्यात परिवर्तन पॅनलने बाजी मारली. विश्वस्तपदी प्रकाश कुलकर्णी तर कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड यांचा विजय झाला.
उपाध्यक्ष: राजेंद्र हुंजे, स्वाती घोसाळकर
कार्यकारिणी सदस्य: गजानन सावंत, दिवाकर शेजवळकर, विनोद साळवी, आत्माराम नाटेकर, रजनीश राणे, अंशुमन पोयरेकर, सारंग दर्शने, राजेश खाडे, किरीट गोरे.
दै. ’सामना’चे गजानन सावंत विक्रमी मताने विजयी
कार्यकारिणी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सर्वच्या सर्व ९ सदस्य निवडून आले. या निवडणुकीत दैनिक ‘सामना’चे वृत्तसंपादक गजानन सावंत यांनी सर्वाधिक ३०९ मते मिळवून बाजी मारली.




























































