सांगली – मिरजेच्या कोविड रुग्णालयात कोरोना रूग्णाची आत्महत्या

मिरजेच्या शासकीय कोवीड  रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णांने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज- मालगाव रस्त्यावरील अमननगर येथे राहणारे हुसेन बाबुमिया  मोमीन(वय – 55) यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने त्यांना मिरजेच्या कोवीड रुग्णालयात (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या) दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री चाकूने गळा कापून त्यांनी आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला.

दरम्यान, शासकीय रुग्णालयाच्या कर्मचारी डॉक्टर आणि योग्य ते उपचार केले नाहीत दुर्लक्ष केले म्हणूनच आत्महत्या केल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे। मात्र पोलिसांनी नातेवाईकांच्या या आरोपाला पुष्टी दिलेली नाही. या रुग्णांनी का आत्महत्या केली याचा तपास पोलीस करीत आहेत, मात्र कोरोनाग्रस्त रुग्णाने शासकीय रुग्णालयातच आत्महत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या