
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मिंधे गट आणि अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे. मिंधे गट आणि अजित पवार गटाला कमळाबाईच्या पदराखाली जावेच लागेल, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नाहीये असे राऊत यांनी म्हटले. या दोघांकडे भाजपच्या चरणाशी बसण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, “ते म्हणत असलेले ‘आमची शिवसेना’ ही नौटंकी आहे. नाटकाची स्क्रिप्ट दिल्लीतील भाजप नेत्यांनी लिहण्यात आली आहे. हा सिनेमा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडेल. यानंतर त्यांना कमळामध्येच विलीन व्हावे लागेल. कमळावरच्या भुंग्याप्रमाणे त्यांना फिरावे लागेल.”
राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, टराहुल गांधी लोकप्रिय नेते आहेत. ते संपूर्ण देशात यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते एक चेहरा आहेत. त्यांचा संघर्ष सुरू असून लोकांना संघर्ष करणारे नेते आवडतात. राहुल गांधी प्रामाणिक असून ते खोटे बोलत नाही. ते देशभक्त आहे. पंतप्रधान होण्यासाठी आणखी कोणते गुण गरजेचे आहेत? मात्र इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल हे सगळे मिळून ठरवू.’
























































