सांताक्रूझमध्ये इमारतीत आग; 37 जण बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांताक्रूझ पश्चिम मिलन सब वे येथील दोन मजली ऑप्शन कमर्शियल इमारतीत आज सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत इमारतीच्या दुसरा मजला व टेरेसवर अडकलेल्या 37 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू केल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग काही वेळात इमारतीत पसरली आणि इमारतीतील गाळेधारकांनी दुसऱया व टेरेसवर धाव घेतली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. यावेळी दुसऱया व टेरेसवर अडकलेल्या 37 गाळेधारकांची इमारतीतील पायऱयांवरून खाली आणत सुखरूप सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलीस, स्थानिक पालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी करीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.