काही दिवसांपूर्वी आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा दिला होता. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाने ( एसबीआय) कर्जदारांना झटका देत व्याजदर वाढवले आहेत. एसबीआयने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे एमसीएलआर मध्ये 0.10 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन यांचा हफ्ता वाढणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसेल.
एमएलसीआर हा एक प्रकारचा व्याजदर आहे. या एमएलसीआरच्या आधारावर बँका ग्राहकांना होम लोन, कार लोन देतात. एसबीआयने याच एमएलसीआरमध्ये वाढ केली आहे. एसबीआयचे कार लोन एक वर्षाच्या एमएलसीआरशी आणि पर्सनल लोन दोन वर्षांच्या एमएलसीआरशी जोडलेले असते.
प्रोसेसिंग फी निश्चित
एसबीआयने होम लोनसाठी आपली प्रोसेसिंग फी निश्चित केली आहे. प्रोसेसिंग फी होम लोनच्या 0.35 टक्के आहे. त्यासोबत जीएसटीही लावली जाते. एसबीआयचा बेस रेट आता 10.40 टक्के आहे, जो 15 जून 2023 पासून लागू आहे. बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटमध्ये ( बीपीएलआर) बदल होऊन तो वार्षिक 15.15 टक्के करण्यात आला आहे. येत्या 15 जून 2024 पासून लागू होईल.
एमएलसीआरचे नवे दर
एसबीआयच्या गृहकर्जाचे व्याज 8.50 टक्के ते 9.65 टक्के यादरम्यान आहे. ते ग्राहकाच्या सिबिल स्कोरवर अवलंबून असते.
एसबीआयचे नवीन एमएलसीआर आता 8.10 टक्के ते 8.95 टक्के यादरम्यान असेल. ओव्हरनाईट एमएलसीआर 8 टक्के वाढून 8.10 टक्के होईल.
एक वर्षाचा एमसीएलआर 8.65 टक्क्यांवरून 8.75 टक्के वाढवला आहे. एक महिना ते तीन महिन्यांचा एमसीएलआर 8.30 टक्क्यापर्यंत वाढवला आहे.