
शालेय जीवनात मुलांवर चांगले संस्कार झाले तरच मुलांचा सर्वांगीण विकासाच्या दिशेने प्रवास सुरु होतो. या प्रवासात चांगले संस्कार देण्याची जबाबदारी आई-वडीलांपेक्षा जास्त शिक्षकांवर असते. पण, गेल्या काही दिवसांमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना देशभरात घडत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये शिक्षकांनी शरीरसंबंध ठेवले. शाळेतील विविध ठिकाणी त्यांनी अशी कृत्ये केली असून त्याचे व्हिडीओ शिक्षकांनी रेकॉर्ड केले आहेत. हे व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या प्रकाराबद्दल शाळेच्या एका शिपायाला पहिल्यांदा कळाले होते. त्याने तत्काळ ही बाब शाळा प्रशासनाला कळवली होती. शाळेच्या शिपायाने 15 नोव्हेंबर, रोजी शाळेतील वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. त्याने ही बाब कळवेपर्यंत व्हिडीओ व्हायरल झाले होते.
व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्यध्यापकांनी 9 डिसेंबर, रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शाळा व्यवस्थापनाने या घटनेची गंभीर दखल घेत एका पुरुष आणि महिला शिक्षकाला निलंबित केले आहे. हे दोघे या कृत्यात सामील असल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या दोघांव्यतिरिक्त इतर दोन शिक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यध्यापकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे बीड शहर पोलिसांनी पुरुष शिक्षकाविरुध्द भारतीय दंड संहिता कलम 292 (2) (अश्लील साहित्य), कलम 294 (अश्लीलता), कलम 500 (बदनामी) आणि माहिती तंत्रत्रानाच्या अनेक तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यासाठी एका विशेष महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेत 23 महिला आणि 36 पुरुष शिक्षिक म्हणून कार्यरत आहेत.
बीड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश चाटे यांनी सांगितले की, “मुख्य आरोपी फरार आहे. त्याच्या नावावर असणारे चार मोबाईल बंद आहेत. त्याचे कुटुंबीय पुण्याला राहतात. त्यामुळे, आम्ही शोध पथके पुण्याला पाठवत आहोत. पुढील तपास सुरु असून लवकरच मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात येईल.




























































