
आपल्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱयांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली येऊ दिले नाहीत. सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टोमॅटो, शिमला मिरची फेकून द्यावी लागत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी केली.
जुन्नर येथे माजी आमदार दिवंगत शिवाजीराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी पवार बोलत होते.
‘‘तोडणीचा खर्चही निघत नसून शेतकरी पीक फेकून देत आहेत. कांद्याचा खर्चही निघत नसून अन्य गोष्टींनाही पिंमत मिळत नाहीय. माझ्याकडे 10 वर्षे पेंद्रीय कृषी खाते होते. शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव देणे या वेळी मी कटाक्षाने पाळले. यामुळे शेतकरी या देशाची भूक भागवतोय. मात्र संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याची कामगिरी करू शकतो. शेतकऱयांनी हे करून दाखवलं आहे,’’ असे शरद पवारांनी या वेळी सांगितले. ‘‘पण दुर्दैवाने पेंद्र सरकारमध्ये यासंदर्भात गरज आहे तितके लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शेतमालाच्या किमती घसरताना दिसत आहेत,’’ असा आरोपही या वेळी शरद पवारांनी केला.
टीका करताना मर्यादेचा विसर
‘अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष उभा राहिल्याचं दिसत आहे. एकमेकांवर टीका करताना मर्यादेचा विसर पडत आहे. काही जणांवर तर वक्तव्य मागे घेण्याची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ येत आहे,’ असे शरद पवार म्हणाले.





























































