महिला जेवढ्या बारकाईने काम करताय तेवढं इतर कोणी करत नाही – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्ष स्थापन झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेची जबाबदारी देणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. तसेच पक्ष स्थापनेनंतर पुढील पाच ते दहा वर्षात सामान्य नागरिकांनी हे दाखवून दिले की, सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता करू शकतो. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कष्ट घेण्याची भूमिका असल्यामुळेच हे घडले आहे. जी भूमिका आपण स्वीकारली आहे ती महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श असलेली असल्याचे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने ‘ज्योत निष्ठेची, सावित्रीच्या लेकींची’ या महिला मेळाव्याचे षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे महिला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, 25 वर्षांपूर्वी याच सभागृहात राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती करण्याचा ठराव केला. त्याच दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्कवर 1 लाख लोकांचा मेळावा पार पडला आणि तिथून पक्ष वाढवायला सुरुवात केली. पक्षाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रच्या जनतेने आपल्याला कौल दिला. आपला पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. आपल्याला स्त्री-पुरुष समानतेसाठीही काम करायचे आहे. असेही शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षित करण्याच काम केलं. विरोधाची चिंता न करता ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. या देशात इंग्रजाचे राज्य होतं ते राज्यकर्त्ये भारतात यायला निघाले त्यांच्या स्वागतासाठी एक कमान बांधण्यात आली. ती गेट वे ऑफ इंडियाची इमारत आहे. त्या ठिकाणी एक गृहस्थ उभा होता. त्या ठिकाणी इंग्रज अधिकारी यांच्या लक्षात आलं की एक गृहस्थ उभा आहे. त्याचं निवेदन त्या अधिकाऱ्याने स्वीकारलं. त्यामध्ये एक मागणी होती की शिक्षणं मिळायला हवं. शेतकऱ्याला पाणी उपलब्ध केल पाहिजे आणि तिसरी मागणी दूध धंदा वाढवण्यासाठी मदत करावी. ह्या सगळ्या मागण्या ज्योतिबा फुले यांनी केल्या होत्या असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, आज सर्वजण इथे एकत्र आलो. संघटनेत काम करण्याची तयारी केली. समाजातील लोकांचे जीवन आपल्याला बदलायचे आहे. स्त्री-पुरुष समानता आपल्याला आणायची आहे. स्त्रीयांनाही संधी मिळाली तर त्या स्वत:ला सिद्ध करु शकतात. मी संरक्षणमंत्री होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की इतर देशात महिला लष्करात मोठ्या पदावर आहेत असेही शरद पवार बोलताना म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, मुंबईहून दिल्लीला चाललो होतो त्यावेळीं माझ्या शेजारी एक गृहस्थ होतें ते लष्करात होतें ते म्हणाले की मुलींना तुम्ही लष्करात महिलांना घेतलं हे चूक केलं मी म्हणलो तुमच्या घरात सर्व काम करणारी महीला असते, स्वयंपाक करणारी महिला असते, कुटुंब सांभाळणारी महीला असते. महिला जेवढ्या बारकाईने काम करताय तेवढं इतर कोणी करत नाही हा किस्साही शरद पवारांनी सांगितला.