शेअर मार्केट धडाम! सेन्सेक्समध्ये 1100 अंशाची घसरण, निफ्टी-बँक निफ्टीही कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये आलेली तेजी कमी होताना दिसत असून सोमवारी बाजाराच्या पहिल्याच दिवशी मार्केट लाल निशाण्यावर उघडले. दुपारपर्यंत मार्केट कोसळले असून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)च्या सेन्सेक्स या निर्देशांकामध्ये 1150 ची घट झाली असून निर्देशांक 57, 600 च्या खाली आला आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा निफ्टी हा निर्देशांक देखील घसरलेला दिसून आला. निफ्टीमध्ये 350 अंशांची घट दिसून आली. या घसरणीसह निफ्टी 17,200 च्या खाली आला आहे. तसेच बँक निफ्टी देखील गटांगळ्या खात असून निर्देशांकामध्ये 750 अंशांची घसरण झाली असून बँक निफ्टी 38,100 च्याही खाली पोहोचला आहे.

कोणत्या शेअरमध्ये जास्त हालचाल?

एचडीएफसी बँकेचा शेअर 3.50 टक्क्यांनी, एचडीएफसी लाईफचा शेअर 3.20 टक्क्यांनी, ब्रिटानियाचा शेअर 3.10 टक्क्यांनी, टाटा कंस्यूमरचा शे्र 3.10 टक्क्यांनी, BAJAJ FINSERV LIMITED चा शेअर 3.05 टक्क्यांनी कोसळला आहे. तर दुसरीकडे पॉवरग्रीडचा शेअर 1.70 टक्क्यांनी, ओएनजीसीचा शेअर 1.70 टक्क्यांनी, एसबीआयचा शेअर 1.10 टक्क्यांनी वधारला आहे.