Video – पाच वर्षे जंगलात भरकटली मेंढी; अंगावर साचली तब्बल 35 किलो लोकर

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात एक अजब घटना उघडकीस आली आहे. या जंगलात एक मेंढी सापडली आहे. तिच्या व्हिडीओची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ही मेंढी दिसायला सर्वसाधारण मेंढी सारखीच आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या मेंढीच्या शरीरावर जवळपास 35 किलो लोकरीचा थर जमा झाला होता.

जंगलात भंटकतीसाठी गेलेल्या एका पथकाला लोकरीचा थर चालताना आढळला. कुतुहलाने त्यांनी निरीक्षण केले असता. ती मेंढी असून तिच्या शरीरावर लोकरीचा मोठा थर साचला होता. व्हिक्टोरियन स्टेट फॉरेस्टमध्ये भटकंती करत असताना आढळलेल्या या मेंढीला पथकाने स्वतः सोबत घेतले व तिची त्या घनदाट जंगलातून सुटका केली.

त्या मेंढीला प्राणी मदत केंद्रात आणण्यात आले. या मेंढीच्या शरीरावरील लोकरीच्या वजनामुळे तिला नीट चालताही येत नव्हते. केंद्रात आणल्यावर तिच्या शरीरावरची लोकर काढण्यात आली. आता या केंद्रातच मेंढीची काळजी घेण्यात येत आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनूसार, या मेंढीला बराक असे नाव देण्यात आले आहे. ही मेंढी साधारणतः 5 वर्ष जंगलात भटकत होती. एवढी वर्ष जंगलात हरवल्यामुळे तिच्या शरीरावरील लोकर साठत गेली व ती 35 किलो इतकी झाली असे सांगण्यात आले.

या मेंढीचा व्हिडीओ आपण पाहू शकता ज्यात लोकर काढल्यानंतर ही मेंढी इतर मेंढ्यांसारखीच दिसत आहे.

एडगर मिशन फार्म सेंचुरीचे संस्थापक पाम अहॉर्न म्हणाले विश्वासच बसत नाहीये की, ही मेंढी लोकरच्या एवढ्या ढिगाखाली जिवंत राहिली. तसेच या मेंढीची लोकर किमान पाच वर्षे कापली गेले नसावी, असेही ते म्हटले. बराकच्या शरीरावरच्या लोकर कापली नसती तर उन्हाळ्यात बराकचा मृत्यू झाला असता. पाम म्हणाले की, ही मेंढी लहान असताना जंगलात भरकटली असावी आणि शहराकडे जाण्याचा मार्ग तिला सापडला नसावा. आता ही मेंढी सुरक्षित आहे व तिची काळजी घेतली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या