जालन्यातील पिंपरखेड येथे शिवसेनेचे नेत्र तपासणी शिबिर

21

सामना प्रतिनिधी । पिंपरखेड

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात असलेल्या पिंपरखेड येथे शिवसेना आणि माउली ऑप्टीकल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात एकूण 210 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांना चष्मे व आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ.अमित विश्वे व डॉ.एस केदार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या पथकाने रुगणांची तपासणी केली. शिबिरात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. या शिबिरात 15 रुग्णांना शस्त्रक्रियासाठी लवकरच मुबंईतील जे.जे.रुग्णालयात पाठवले जाणार आहे.

शिबिराच्या आयोजनासाठी अनिल सानप, महादेव जायभाये, अंकुश माणे, गजानन बडे, गणेश सिरसाट, शिवाजी मिसाळ, धर्मराज आंधळे यांनी पुढाकार घेतला. तसेच अशोक मिसाळ, श्रीराम सिरसाट, पंडीत गर्जे, बाबा जायभाये, प्रदीप नागरे, सोमनाथ घुगे, ऋषिकेश सानप, अशोक वावधने, पांडुरंग नागरे, रत्नदिप सानप, सतीश खंदारे यांच्यासह ग्रामस्थांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या