
सामना प्रतिनिधी । जळगाव
धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे शिवसेना उपनेते तथा राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा सर्व पक्षीयांकडून जाहीर सत्कार करण्यात आला. धरणगाव येथील पदमश्री भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात कॉग्रेसचे नेते डी.जी. पाटील, राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, विघापीठचे सिनेट सदस्य प्रा.दिलीप पाटील, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष पी. एम.पाटील सर, डॉ. मिलींद डहाळे, जि.प.चे. माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील,भगवान महाजन, प्रा.बी. एन. चौधरी, ज्येष्ठ नेते भदाणे गुरुजी, शरदकुमार बन्सी, शिवसेनेचे प्र. नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, अॅड.शरद माळी, भागवत चौधरी, वाल्मिक पाटील, आर. एच. पाटील, नंदु पाटील, योगेश पाटील, अजय चव्हाण, सुरेश महाजन, धीरेंद्र पुरभे, चेतन जाधव, बुट्या पाटील, राहुल रोकडे, जयेश महाजन आदी उपस्थीत होते.

































































