
शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि नगरसेवक निशिकांत शिंदे यांच्या मातोश्री अनुसया गोविंद शिंदे यांचे वृद्धापकाळाने लोअर परळ येथील चिरायू को. ऑपरेटिव्ह सोसायटीमधील निवासस्थानी आज निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले आणि शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
अनुसया शिंदे यांनी मंगळवारी मध्यरात्री 12.25च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर, महेश सावंत, भाजप आमदार कालिदास कोळंबकर आदींनी अनुसया शिंदे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर दुपारी वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
























































