
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष यांच्यावतीने मुंबई व उपनगर विभागातील ज्येष्ठ शिवसैनिकांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन उद्या शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता सावंतवाडी संस्थान सभागृह, तिसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिराशेजारी, दादर पश्चिम येथे होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
थोर समाजसुधारक, साहित्यिक, झुंजार पत्रकार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष स्थापन करण्यात आला. या ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले असून मुंबई व उपनगर विभागातील ज्येष्ठ नागरिकांसह शिवसेना नेते आणि उपनेतेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे अध्यक्ष विश्वनाथ खताते आणि सचिव चंद्रकांत कोपडे यांनी दिली.


























































