
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या शूटर अंकित सिरसा याला अटक करण्यात आली आहे. मूसेवालाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना हे मोठे यश मिळाले आहे. अंकितवर राजस्थानमध्ये खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल/एनडीआर (नवी दिल्ली रेंज) च्या पथकाने लॉरेन्स बिश्नोई-गोल्डी ब्रार टोळीतील दोन मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपी अंकित हा सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या शुटरपैकी एक आहे.
पोलिसांनी या आरोपीकडून पंजाब पोलिसांचे तीन गणवेश, एक 9 एमएम पिस्तूल, एक .3 एमएम पिस्तूल आणि डोंगल्ससह दोन मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित सिरसा याने सिद्धूवर गोळीबार केला. प्रियव्रत फौजीसोबत अंकित त्याच्या कारमध्ये उपस्थित होता. सुरुवातीला अंकित आणि फौजी दोघेही एकत्र पळून गेले होते. पोलिसांनी प्रियव्रतला यापूर्वीच अटक केली आहे.
स्पेशल सेलने अंकितसह सचिन भिवानी याला देखील अटक केली आहे. भिवानीवर मूसवालाच्या शूटर्सना आश्रय दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, लॉरेन्स हा भिवानी राजस्थानमधील विश्नोई टोळीचे संपूर्ण काम पाहत असे. रविवारी रात्री 11 वाजता पोलिसांनी आरोपींना कश्मिरे गेटजवळ अटक केली होती. पोलिसांनी आरोपींकडून पिस्तुलाशिवाय पंजाब पोलिसांचे तीन गणवेशही जप्त करण्यात आले आहेत. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत डझनभर आरोपींना ताब्यात घेतले आहे.






















































