पोलिसांना सापडलेले अवशेष हे श्रद्धाचेच, डीएनए चाचणीचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रद्धा वालकर हिच्या हत्या प्रकरणात पोलिसांना एक मोठं यश हाती लागलं आहे. मेहरौलीच्या जंगलात पोलिसांना जे अवशेष हाती लागले होते, त्याची डीएनए चाचणी करून ते अवशेष श्रद्धाचेच आहेत हे पटवणं हे मोठं आव्हानात्मक काम होतं. पोलिसांनी विकास वालकर यांचे डीएनए चाचणीसाठी काही नमुने घेतले होते. त्यांचा डीएनए पोलिसांना सापडलेल्या अवशेषांमधील हाडांशी जुळला आहे. ज्यामुळे पोलिसांना सापडलेले अवशेष हे श्रद्धाचेच असल्याचे सिद्ध झाले आहे. हा पुरावा न्यायालयात खटला उभा राहील तेव्हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर हे डीएनए नमुने पोलिसांना सापडलेल्या अवशेषांशी जुळले नसते तर पोलिसांना ते शोधण्यासाठई पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागली असती. याशिवाय आफताब जी माहिती देतोय ती खरी नाही असाही अर्थ निघाला असता, ज्यामुळे त्याची पुन्हा सखोल चौकशी करावी लागली असती.