श्रद्धा वालकर हत्याकांड, वृत्तवाहिन्यांनी आरोपपत्रातील माहिती उघड करू नये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृत्तवाहिन्यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडाबाबत पोलिसांनी दाखल केलेल्या सहा हजार पानांच्या आरोपपत्रातील माहिती दाखवू नये, प्रक्षेपित करू नये असे स्पष्ट आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने वृत्तवाहिन्यांना दिले आहेत. या हत्याकांडाप्रकरणी श्रद्धा हिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याला अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून दिल्लीतल्या महारौली येथील जंगलात टाकले होते. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता.