सांवलिया सेठच्या खजिन्याची मोजदाद सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राजस्थानातील चित्तौडगढ जिल्ह्यातील श्री सांवलिया सेठ हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. येथे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिरात आलेला प्रत्येक जण आपल्य़ा श्रद्धेने आणि इच्छेने काहीना काहीना दान देत असतो. त्यामुळे या मंदिराल भरभरुन दान मिळते. आता याच प्रसिद्ध श्री सांवलिया सेठ मंदिरातील दानपेट्यांमधून पुन्हा एकदा भरघोर संपत्ती मिळाली आहे. या दानपेटीतून मोजणीच्या पहिल्याच दिवशी तब्बल 6 कोटीहून अधिक रुपयांचे दान या मंदिराला प्राप्त झाले आहे.

प्रसिद्ध सावलिया सेठ मंदिरात दर महिन्याच्या अमावस्येला दानपेटी उघडली जाते. येथे येणारे भक्त देवासाठी भरभरुन दान देतात. या दानामध्ये फक्त पैसे नसून सोने, चांदीचे दागिन्यांचाही समावेश असतो. या महिन्यात जानेवारी महिन्यात उघडण्यात आलेल्या दानपेटीच्या पहिल्याच दिवशी दानाच्या मोजणीत 6 कोटी 21 लाख 70 हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम काढण्यात आली आहे. तर सोने, चांदिच्या दागिन्यांची मोजणी अद्याप सुरु आहे.

गेल्या महिन्यात सणवालियाशेठ मंदिरात दोन महिन्यांसाठी दानपेटी उघडण्यात आली होती. मंदिर प्रशासनाकडून चार टप्प्यात मोजणी करण्यात आली. यामध्ये 17 कोटी 19 लाख 31 हजार 800 रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे. तसेच यामध्ये 552 ग्राम सोने तर 16 किलो 670 ग्राम चांदीचा समावेश आहे. या शिवाय मंदिराला भेट म्हणून मिळालेल्या दागिन्यांमध्ये 107 ग्राम सोन्याचे तर 40 किलो 425 ग्राम चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.