
सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत पवार (82) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई असा परिवार आहे. दै. ‘सामना’चे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी हरिश्चंद्र पवार व जयराम (बाळा) पवार यांचे ते वडील होत. चंद्रकांत पवार यांच्या पार्थिवावर तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.


























































