प्रिकॉशन डोसच्या चाचणीसाठी सिरो सर्वेक्षण! मार्चमध्ये तीन हजार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सचे सर्वेक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी समूळ उच्चाटनासाठी पालिका खबरदारी घेत आहे. यामध्ये प्रिकॉशन डोस दिल्यानंतर शरीरात वाढलेल्या अँटीबॉडी तपासणीसाठी सहावे सिरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात तीन हजार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्समध्ये सिरो सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. यामध्ये तिसरा डोस दिल्यानंतर कोरोनाचा सामना करणाऱ्या अँटीबॉडीज पाहून आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली असून पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 95 टक्के जणांचा दुसरा डोसही झाला आहे. मात्र अजूनही दररोज कोरोनाचे शेकडो रुग्ण सापडत आहेत. शिवाय पूर्ण लसीकरण होऊनही कोरोनाची लागण आणि मृत्यू झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे पालिकेने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 10 जानेवारीपासून ‘प्रिकॉशन’ डोस देण्यास सुरुवात केली आहे. या प्रिकॉशन डोससाठी पात्र असलेल्या 13 लाख लाभार्थ्यांमधील 3 लाख 9 हजार 810 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.

अशी आहे प्रिकॉशन लाभार्थ्यांची आकडेकारी

  • मुंबईत सुमारे 1 लाख 88 हजार आरोग्य कर्मचारी आहेत.
  • तर 1 लाख 50 हजार प्रंटलाइन कर्कर्स आहेत.
  • शिकाय 10 लाखांकर ज्येष्ठ, सहक्याधीग्रस्त आहेत.
  • आतापर्यंत वेगवेगळे वयोगट, समाजाचे वेगवेगळे घटक, सोसायटय़ा-झोपडपट्टय़ा अशा ठिकाणी सिरो सर्वेक्षण करण्यात आले आहे. केलेल्या पाच सिरो सर्वेक्षणात सुमारे 80 टक्के जणांमध्ये अँटीबॉडी निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
  • मुंबईत 16 जानेवारी 2021 पासून मोठय़ा प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळे कोरोनाचा सामना करणारी प्रतिपिंडे, प्रतिकारशक्ती निर्माण झाली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
  • आताच्या सर्वेक्षणात प्रिकॉशन डोस घेतलेल्या आणि न घेतलेल्या अशा संमिश्र आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्समध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रिकॉशन डोसचे महत्त्वही समोर येणार आहे.