आंध्र प्रदेशमध्ये सहा वर्षाच्या मुलावर बलात्कार, गुप्तांगात घातली मिरची आणि खडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 6 वर्षाच्या मुलावर बलात्कार करून नराधमाने त्याच्या गुप्तांगात मिरची आणि खडे घातले आहेत. पीडित मुलाला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये एक सहा वर्षाचा मुलगा खेळत होता. तेव्हा एक व्यक्ती त्याला खाऊ देण्याच्या बहाण्याने शेतात घेऊन गेला. आरोपीने आधी मुलावर बलात्कार केला. तेव्हा मुलगा बेशुद्ध झाला. मुलगा बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या गुप्तांगात आरोपीने मिरची आणि खडे घातले.

शुद्धीवर आल्यावर मुलगा कसाबसा घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर पालकांच्या लक्षात आले की त्याच्या गुप्तांगातून रक्त येत आहे. पालकांनी जेव्हा तपासून पाहिले तेव्हा त्याच्या गुप्तांगात मिरची आणि खडे आढळले. पीडित मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीचा शोध सुरू आहे.