दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग घटल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा आनंद द्विगुणित झाला असून त्यांनी दिवाळीनिमित्त मोठी खरेदी केली आहे. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून आपल्या विभागातील नागरिकांना दिवाळीची भेट म्हणून आकाशकंदील, रंगीबेरंगी पणत्या, सुगंधी उटणे वाटप केले जात आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने लोकशांती सहकारी संस्थेचे चेअरमन विलास पाटील व नीलेश मानकर यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार दिवाळी अंकाची अनोखी भेट देण्यात आली. यावेळी  शाम गांगण, मुकुंद फडतरे, जीवन भोसले, शंकर रिंगे उपस्थित होते.

mumbai

युकासेना सिनेट सदस्य व मुंबई म्युनिसिपल को-ऑप.बँक संचालक प्रदीप साकंत यांच्या कतीने दीपाकली सुगंधी उटणे काटप करण्यात येत असून या उपक्रमाचा शुभारंभ शिकसेना सचिक सूरज चक्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

diwali-ank-2021

भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मंगळवार, 2 नोव्हेंबरला भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि चिटणीस संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत 2020-21 या वर्षात विमानतळ विभागातील मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना दिवाळीनिमित्त फराळ आणि आर्थिक सहाय्य देण्यात आले. नातेवाईकांनी मदतीबद्दल आणि दिवंगत कामगारांची आठवण ठेवल्याबद्दल आभार मानले. हा उपक्रम संतोष कदम, सहचिटणीस सूर्यकांत पाटील, जगदीश निकम, राजा ठाणगे, विजय शिर्के, मिलिंद तावडे, संजीव राऊत, सदस्य नीलेश ठाणगे, बाबा शिर्के, पोपट बेदरकर यांच्या वतीने राबवण्यात आला. यावेळी विमानतळ विभागातील सर्व पदाधिकारी, कमिटी सदस्य आणि कामगार उपस्थित होते.