‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये

115

सामना ऑनलाईन, मुंबई

जगण्याची नवी दिशा देणाऱ्या ‘स्माइल प्लीज’ या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक उत्कृष्ट दर्जाच्या, उत्तम आणि आगळेवेगळे विषय, कथानक असणाऱ्या चित्रपटांची निवड केली जाते. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले. चित्रपटातील गाणी, मराठी सिनेसृष्टीतील तीसहून अधिक कलाकारांना एकत्र घेऊन चित्रित करण्यात आलेल्या अँथम साँगलाही रसिकांनी पसंती दिली. या चित्रपटाला मंदार चोळकर यांची गाणी लाभली असून रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या