
हरयाणातील भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांना पीए आणि मित्राने जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्यांची हत्या केली, असे आरोपपत्र तपास करणाऱया सीबीआयच्या टीमने गोव्यातील न्यायालयात आज सादर केले. फोगट यांच्या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात पीए आणि मित्राला अटक करण्यात आली आहे.
गोव्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या भाजप नेत्या सोनाली पह्गट यांचा कर्लीज बारमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला गोवा पोलिसांनी या हत्येचा तपास केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. त्यानुसार सीबीआयने अटकेत असलेल्या पह्गट यांचे पीए सुधीर सांगवान आणि मित्र सुखविंदर यांची चौकशी केली. तपासादरम्यान, गोवा पोलिसांनी तयार केलेल्या 500हून अधिक पानांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. त्याचबरोबर सांगवान आणि सुखविंदर यांच्यासोबत कर्लीज बारमध्ये सीन रिक्रिएट केला होता. त्याचबरोबर गोवा पोलीस आणि सीबीआयने गोव्यापासून हरयाणातील हिसार, रोहतक, गुरुग्रामपर्यंत तपास केला होता. त्यानंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.






















































