गुंतवणूकदार, व्यापारी व अर्थतज्ञांसाठी ट्विटरचे खास फिचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुंतवणूकदार, व्यापारी व अर्थतज्ञांसाठी खास डिझाइन केलेले एक नवीन फीचर ट्विटरने आणले आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी या उत्तम फीचरसाठी ट्विटर टीमचे कौतुक केले आहे. इलॉन मस्क यांनी या वैशिष्ट्याबद्दल सांगितले की, हे फिचर विशेषत: गुंतवणूकदार, व्यापारी, आर्थिक तज्ञ आणि संस्थांसाठी डिझाइन केले आहे. ट्विटरमधील या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स एकाच ट्विटमध्ये मोठ्या स्टॉकचे चार्ट पाहू शकणार आहेत. यासोबतच यामधून ईटीएफ आणि क्रिप्टोचीही माहिती मिळू शकणार आहे.

ट्विटर बिझनेस हँडलने या नवीन फीचरबद्दल ट्विट केले आहे. ट्विटनुसार, जेव्हा जेव्हा युजर मोठ्या स्टॉकच्या चिन्हासमोर “$” लिहून ट्विट करेल, तेव्हा तो स्टॉक आपोआप क्लिक करण्यायोग्य होईल. त्यामुळे युजरला थेट किंमतीच्या आलेखासह त्या स्टॉकची सर्व माहिती मिळणार आहे. युजर्स ट्विटमधील लिंकवर क्लिक न करता थेट चिन्ह शोधू शकतात. कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी या उत्तम फीचरसाठी ट्विटर टीमचे कौतुक केले आहे. मस्कने ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर ट्विटर ब्लू नावाने 8 डॉलर सबस्क्रिप्शन चार्जसह अनेक बदल केले आहेत. मात्र, फेक अकाऊंट आणि ट्विटमुळे सबस्क्रिप्शन सेवा काही काळासाठी बंद करावी लागली. आता मस्कने गेल्या आठवड्यात ट्विटर सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा सुरू केली आहे.