
राज्यात आज 11,277 रुग्ण बरे होऊन घरी, आतापर्यंत एकूण 15,51,282 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.07% एवढे झाले आहे.
आज राज्यात 5246 नवीन रुग्णांचे निदान झाले असून आज 117 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 92,50,254 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17,03, 444 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12, 52,758 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 12,003 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

























































