विद्यार्थ्यांशी जातीभेद करणाऱ्या शिक्षकांची खैर नाही, यूजीसीने दिले कारवाईचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एससी, एसटी आणि कोणत्याही जातीच्या आधारावर विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी गैरव्यवहार केला तर त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. आतापर्यंत यूजीसीकडे रॅगिंगच्या तक्रारी येत होत्या. गेल्या काही काळापासून मेडिकल, इंजिनियरींग व अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर शिक्षकांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने यूजीसीने हा निर्णय घेतला आहे.

यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी यासंदर्भात सर्व विद्यापीठांना पत्र पाठवले आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीभेद होत असल्याच्या तक्रारींवरून यूजीसीची संबंधित संस्थांवर बारीक नजर आहे. महाविद्यालयांतील शिक्षक किंवा अधिकाNयांनी विद्यार्थ्यांशी जातीभेद करू नये असेही त्यांनी बजावले आहे.

कॉलेजच्या वेबसाईटवर करता येणार तक्रार
विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर कुणी अधिकारी वा शिक्षकाने त्रास दिला तर त्याची तक्रार करण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांनीr आपल्या वेबसाईटवर स्वतंत्र व्यवस्था करावी अशा सूचनाही जैन यांनी या पत्रात दिल्या आहेत.