जम्मू-कश्मीरच्या राज्यपालांचे नवे सल्लागार नक्षलविरोधी तज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करताच राज्याचे मुख्य सचिव बी.बी. व्यास यांच्या जागी छत्तीसगड कॅडरचे आयएएस अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांना नियुक्त करण्यात आले. तर बी.बी. व्यास यांच्यासोबतच नक्षलविरोधी कारवाईचे तज्ञ के. विजयकुमार यांना राज्यपाल व्ही.एन. व्होरा यांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तांची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने मंजुरी दिल्यानंतर करण्यात आली आहे.

मुख्य सचिव राहिलेले व्यास हे राज्यपाल व्होरा यांचे खास विश्वासातले मानले जातात. त्यांना निवृत्तीनंतर ३१ मे २०१८ रोजी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.

के. विजयकुमार कोण?

बी.बी. व्यास यांच्यासोबतच राज्यपालांच्या सल्लागार पदावर नियुक्त करण्यात आलेले के. विजयकुमार हे १९७५ च्या बॅचचे तामीळनाडू कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. १९९८-२००१ या काळात त्यांनी कश्मीर खोऱ्यात सीमा सरक्षा दलाचे महानिरीक्षक म्हणून काम केलेले आहे. चंदन स्मगलर वीरप्पन याच्याविरोधात तयार करण्यात आलेल्या स्पेशल टास्क फोर्सचेही ते प्रमुख होते