
जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 11 डिसेंबरला फैसला सुनावणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घटनापीठासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली होती. 5 सप्टेंबरला या खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यापूर्वी यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 16 दिवस सुनावणी झाली होती.
























































