भाईगिरी किंवा गुंडगिरी करणार नाही, एसयूव्ही मालकांना दिली शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थार किंवा फॉर्च्युनर ही गाडी भाईगिरी किंवा गुंडगिरी करण्यासाठी नाही. तुम्ही रस्ते अपघातातील पीडितांना मदत करायला हवी, असे म्हणत थार आणि फॉर्च्युनरसारख्या एसयूव्ही वाहनांच्या मालकांना रांगेत उभे करून सुरक्षित वाहन चालविण्याची शपथ देण्यात आली. हा प्रकार घडला दमणमध्ये. दमण जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभागाने ‘रफ्तार नही संस्कार’ ही रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी दमणचे जिल्हाधिकारी सौरभ मिश्रा यांनी जिल्ह्यातील एसयूव्ही वाहन मालकांना वाहनांसह एकत्रित केले आणि रस्त्यावर भाईगिरी किंवा हीरोगिरी करणार नाही, अशी शपथ दिली. वाढलेले रस्ते अपघात तसेच रोड रेजसारख्या घटना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. एसयूव्ही मालकांच्या हाती रस्ते सुरक्षेचा संदेश देणारे पोस्टर्सदेखील देण्यात आले होते.