
यंदाच्या टी 20 विश्वचषकातील आजची अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड संघांतील महत्त्वपूर्ण लढत म्हणजे न्यूझीलंड -टीम इंडियातीलच सामना होता. कारण अफगाणिस्तानने किवीजना पराभूत केले असते तर हिंदुस्थानी संघ सरस धावगतीच्या बळावर उपांत्य फेरीत मजल मारू शकणार होता. पण ‘अफगाणी जलेबी’ या लढतीत शिजलीच नाही. बलाढय़ किवीजच्या फलंदाजांनी 18.1 षटकांतच विजयासाठीचे 125 धावांचे आव्हान 2 विकेट गमावून पार केले. त्याआधी त्यांच्या गोलंदाजांनी लढाऊ अफगाण संघाचा डाव 20 षटकांत 8 बाद 124 धावांवर रोखला होता. अफगाण संघ या लढतीत पराभूत झाल्याने टीम इंडियाचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता उद्याच्या नामिबियाविरुद्धच्या लढतीनंतर विराट अँड कंपनीला आपल्या बॅगा भरून रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागणार आहे.
आजचा सामना
हिंदुस्थान
विरुद्ध
नामिबिया
गट 2, दुबई
वेळ – रात्री 7.30 वाजता



























































