
स्वातंत्र्य भीक मागून मिळाले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिचा ‘पद्मश्री’ पुरस्कार परत घ्या, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मुंबईत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
शिवसेना शिवडी विधानसभा व शाखा क्र. 206च्यावतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, शुभदा पाटील उपस्थित होते. दक्षिण विभाग क्र. 11 वरळी विधानसभा आणि शाखा क्र. 198 वतीने निषेध करण्यात आला.






























































