
गेल्या वर्षी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर स्थानिक लोकांवर तालिबान्यांची दडपशाही सुरू झाली आहे. देश पुन्हा एकदा क्रुर तालिबानी नियम व दहशतीखाली होरपळा जाईल, यामुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबान्यांनी काही स्थानिंकांना मारहाण करून त्यांच्यावर इस्लाम धर्म लादण्यास सुरूवात केली आहे.
एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कंदाहर प्रांतातील एका भरगच्च भरलेल्या फुटबॉलच्या मैदानात चोरांचे हात छाटण्यात आले. तर त्याच मैदानात 9 जणांना वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी अमानुष मारहाण करण्यात आली. तालिबानी अधिकारी, धार्मिक मौलवी व तेथील स्थानिक लोकांसमोर प्रत्येकाला 35 ते 39 वेळा मारण्यात आले. अफगाणी पत्रकार ताजुद्देन सोरौश याने मैदानाबाहेरील फोटो शेअर करत, इतिहासची पुनरावृत्ती. 1990 सारखेच जाहिर शिक्षा देण्यास सुरूवात केली, तालिबानने असे म्हटले आहे.
गेल्याच महिन्यात, तालिबान सत्तेत आल्यानंतर एका अफगाणी माणसाने दुसऱ्या अफगाणी माणसाला मारल्याच्या गुन्ह्या अंतर्गत सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. व ही फाशी पीडीताच्या वडिलांना पश्चिमेतील फराह प्रांतातील शेकडो लोकांसमोर व वरिष्ठ तालिबानी अधिकाऱ्यांसमोर त्याला शिक्षा देण्यास भाग पाडले.

























































