इराणच्या धर्तीवर तालिबानचे सरकार? मुल्ला बरादर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. आता तालिबानी अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन होणार आहे. इराणच्या धर्तीवर अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन होईल असे म्हटले जाते. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मुल्ला बरादर सर्वात पुढे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुल्ला हकीम मुख्य न्यायाधीश होण्याची शक्यता आहे.

तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लह अखुंदजादा असणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची स्थापना होणार आहे. या परिषदेत 11 ते 27 सदस्य असणार आहे. सध्या अफगाणिस्तानची राजधानी काबुल आहे. परंतु तालिबान्यांच्या राज्यात कंधार ही नवी राजधानी असणार आहे, कारण कंधार ही तालिबान्यांची पारंपरिक राजधानी आहे.

तालिबान पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तीन नावे पुढे आहेत. त्यात अब्दुल गनी बरादर, मुल्ला बरादर आणि मुल्ला याकूब यांचा समावेश आहे. मुल्ला उमर हा मुल्ला याकूबचा मुलगा आहे. मुल्ला उमरने 199६ साली अफगाणिस्तानमध्ये इस्लामी अमिरातची स्थापना केली होती. 1980 साली सोव्हिएतच्या लढ्यात मुल्ला उमरने नेतृत्व केले होते. 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये हल्ला केला होता. तेव्हा मुल्ला उमरने अफगाणिस्तानमधून पळून गेला होता.

न्यायाधीशपदी मुल्ला हकीमची वर्णी लागू शकते. हकीम हा एक वृद्ध व्यक्ती असून तो मुल्ला उमरचा गुरू मानला जातो. मुल्ला हकीम सध्या तालिबान वार्ता शाखेचा प्रमुख आहे.