
अफगाणिस्तानची सत्ता बळकावणाऱया तालिबानकडून शुक्रवारच्या नमाजानंतर नव्या सरकारची घोषणा केली जाणार आहे. संघटनेचा प्रमुख धार्मिक नेता मुल्ला हेबतुल्ला अखुंदजादाला देशाचा सर्वोच्च नेता बनवला जाईल. त्याच्याच मर्जीने पंतप्रधान, राष्ट्रपतींची निवड होईल. सरकारमध्ये उच्चशिक्षितांसह महिलांना स्थान दिले जाणार आहे.
अफगाणिस्तानला इस्लामिक प्रजासत्ताक देश बनवल्याच्या खुशीत तालिबानने सरकार स्थापण्यासाठी मुद्दाम नमाजाचा दिवस निवडला आहे. गेली 20 वर्षे सरकारमध्ये असलेल्या लोकांना नव्या सरकारमध्ये स्थान न देण्याचे तालिबानने ठरवले आहे.


























































