
शासकीय रुग्णालयांत होणाऱया मृत्यूंशी आरोग्य विभागाचा संबंध नाही. नांदेड, छत्रपती संभाजीनगरमधील मृत्यूंना केवळ मी एकटा नव्हे, तर अख्खं मंत्रिमंडळ जबाबदार आहे, असा हल्ला आपल्याच पक्षाच्या मिंधे सरकारवर चढवत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सरकारी रुग्णालयांतील मृत्यूंची जबाबदारी झटकली.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या आरोग्य अधिकाऱयांच्या दोनदिवसीय प्रादेशिक परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, प्रथम ठाणे येथील कळवा रुग्णालय, नंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालय येथे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्याचा आरोग्य विभागाशी संबंध नाही. ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे. यावेळी पेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यादेखील उपस्थित होत्या.
राज्यात औषधांचा तुटवडा नाही, खरेदीही रखडलेली नाही. याउलट राज्य शासनाने खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. औषध खरेदी वेळेत व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱयांना अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तसे आदेशही काढण्यात आल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री खरे बोलले – अंबादास दानवे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, तानाजी सावंत यांना आपला जिल्हा सांभाळता येत नाही. ते राज्य काय सांभाळणार? तानाजी सावंत जे म्हणाले ते खरेच आहे. शासकीय रुग्णालयातील मृत्यूंना एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, संपूर्ण राज्य सरकारच जबाबदार आहे, असा टोला दानवे यांनी लगावला.

























































