अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । राहुरी

नव्याने बदली झालेल्या शाळेवर हजेरी लावुन घराकडे परत निघालेल्या शिक्षकाच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने या शिक्षकाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी तालुक्यातील धामोरी फाटा येथे शुक्रवारी रात्री अपघाताची ही घटना घडली.रमेश बापु होडगर वय ४० राहणार प्रिंप्री विळद तालुका नगर या शिक्षकाची कोपरगाव येथे बदली झाली होती.होडगर हे शुक्रवारी कोपरगाव येथे कामावर हजर झाले.

रात्री पिंप्री विळद या आपल्या घराकडे मोटरसायकलवर परतीचा प्रवास सुरू असताना धामोरी फाटा येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी रस्त्याने जाणा-या नागरीकांनी जखमी होडगर यांना उपचारा साठी राहुरी ग्रामीण रूग्णाल्यात दाखल करण्यात मदतकार्य केले.मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आज सकाळी राहुरी येथे शव विच्छेदना नंतर होडगर यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.दुपारी प्रिंप्री विळद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने प्रिंप्री परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.