शिक्षकाच्या पत्नीशी छेडछाड; बलात्काराची धमकी, पतीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

उत्तर प्रदेशमध्ये काही नराधम एका शिक्षकाच्या पत्नीला बलात्काराची धमकी देत होते, या त्रासाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये एक शिक्षक आणि त्याची पत्नी बहराईच जिल्ह्यात एका इमारतीत राहत होते. दोघेही शिक्षक होते. इमारतील काही नराधम शिक्षकाच्या पत्नीची सातत्याने छेड काढत होते. तसेच बलात्कार करण्याची धमकीही देत होते. या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहली असून आरोपींची नावेही लिहिली आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.