
आपल्या अतरंगी कपड्यांमुळे कायम चर्चेच असलेली अभिनेत्री उर्फी जावेद आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. उर्फीची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या येत आहेत. सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करत असते. नुकतेच तिने तब्येत बरी नसल्याचे सांगत तिच्या ओठांची झालेली अवस्था सांगत फोटो शेअर केला आहे.
उर्फी जावेदची प्रकृती सध्या ठीक नाही. तिने कोरोनाची चाचणीही केली आहे. तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या ओठांचा फोटो शेअर केला आहे. त्या सेल्फीमध्ये तिचे ओठ खूप सुजलेले दिसत आहेत. तिने ओठांचा फोटो शेअर करत तिची स्थिती कॅप्शनमध्ये सांगितली आहे. त्यात तिने लिहिले, “जेव्हा मी आजारी पडते त्यावेळी माझ्यासोबत असे होते. माझे ओठ बदकासारखे सूजतात. कोरोनाच्या चाचणीचे आज रिपोर्ट येणार आहेत त्यानंतरच कोविड की व्हायरल याचा पत्ता लागणार आहे.
उर्फीला तिच्या अतरंगी कपड्यांमुळे अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी तिने पेंटेड ब्रेस्ट स्टाइल ड्रेस तिने घातला होता, त्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती. ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे नेटिझन्सच्या निशाण्यावर येते, त्याचप्रमाणे तिच्या विधानांमुळेही ती अनेकदा वादात सापडते.
जेव्हा उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत अभिनेता रणबीर कपूरने बॅड टेस्ट अशी प्रतिक्रिया दिली होती, त्यावेळी उर्फीने मजेत त्यांची काय लायकी आहे? असे म्हंटले होते. उर्फीचे हे वक्तव्य तिच्यावरच उलटले,ट्रोल झाल्यानंतर उर्फी सारवासारव करत ती मजेत बोलल्याचे म्हंटले होते. उर्फी जावेदने अनेक टिव्ही शोजमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बिग बॉस ओटीटी’, ‘बेपनाह’ और ‘मेरी दुर्गा’ या मालिकांचा समावेश आहे.

























































