‘द केरळ स्टोरी’ला शबाना आझमींचा पाठिंबा, विरोध करणाऱ्यांची केली कान उघडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वादाचे काहूर माजले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले होते. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. एकीकडे काही लोक याचे समर्थनही करत आहेत, तर काही विरोध करत आहेत. आता ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांची कान उघडणी केली आहे. सोमवारी ट्विट करत ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला समर्थन दर्शविले आहे.

सोमवारी सकाळी शबाना आझमी यांनी द केरळ स्टोरीला (The Kerala Story) विरोध करणारे आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाला (Laal Singh Chaadha) विरोध करणाऱ्यांइतकेच चुकीचे असल्याचे म्हटले. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपट पास केल्यानंतर इतर कोणालाही अतिरिक्त घटनात्मक अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, अनेक राजकीय पक्षांनी तसेच संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली.

बक्कळ कमाई

वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतरही ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड सुरू आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने 8 कोटींची कमाई केली. तर गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने 35 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)