कोरोनाची लस न घेतल्याने यूकेमध्ये वाढतोय ओमायक्रोनचा धोका

जगभरात ओमायक्रोनच्या प्रकरणांमध्ये मोठी काढ होत असून यूकेमध्ये याचा धोका सर्वाधिक वाढताना दिसत आहे. येथे अद्याप अनेकांना कोरोनाची लस मिळालेली नाही. हे रुग्णवाढीमागचे एक कारण सांगितले जात आहे. रुग्णालयात दाखल झालेले बहुतांश कोरोना रुग्ण हे  लस मिळालेली नाही आणि त्यांचे वय 20 ते 30 वर्षे वयोगटातील असल्याचे रॉयल लंडन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रोफेसर रुपर्ट पिअर्स यांनी सांगितले.

लंडनमध्ये लसीकरणाचा दर सर्वात कमी आहे. संपूर्ण यूकेमध्ये 82 टक्के लोकांच्या तुलनेत केवळ 61 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. बीबीसी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत प्रोफेसर पिअर्स म्हणाले, आमच्याकडे आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांपैकी 80 ते 90 टक्के लोकांचे लसीकरण झालेले नाही. आमच्याकडे येणारे बहुतेक रुग्ण त्यांना आता लस मिळेल का? असेच विचारत आहेत.

लंडनमध्ये ओमायक्रोनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे थंडीचा हंगाम लक्षात घेता येथील आयसीयूची क्षमता दुप्पट करण्यात येत आहे. गरज भासल्यास कारपार्किंगमध्ये फील्ड हॉस्पिटल बांधण्याचीही योजना आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रोनच्या बहुतेक रुग्णांमध्ये सध्या केकळ सौम्य लक्षणे दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांना जनरल कॉर्डमध्ये दाखल करण्यात येत आहे.

बूस्टर डोसचा असर

तज्ञांच्या मते यूकेमधील बहुतेक कृद्धांनी आधीच बूस्टर डोस घेतला आहे. यामुळेच रुग्णालयांमध्ये लस न घेतलेल्या, बूस्टर डोस न घेतलेल्या किंका अलीकडेच लस घेतलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे. लंडनमध्ये, 33.4 लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे.