‘जय श्रीराम म्हणणारे मुनी नाही तर राक्षस’, काँग्रेस नेते राशीद अल्वींच्या वक्तव्यावर सर्व स्तरांतून जोरदार टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील हिंदुत्वाचे विश्लेषण वादात सापडले असताना काँग्रेसचे अजून एक नेते राशीद अल्वी यांनी जाहीर कार्यक्रमात केलेले विधान वादात सापडले आहे. ‘जय श्रीरामची घोषणा देणारे सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत,’ असे वक्तव्य केल्याने सर्वच स्तरांतून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

भाजप नेते अमित मालवीय यांनी राशीद अल्वी यांच्या या विधानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राशीद अल्वी जय श्रीरामची घोषणा करणाऱयांविषयी मत मांडताना दिसत आहेत. ‘जे जय श्रीरामची घोषणा देतात, ते सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे’, असं राशीद अल्वी म्हणाले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याची खातरजमा झाली नसली तरी अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल होऊ लागला आहे.

अल्वी यांचा व्हिडीओ पोस्ट करताना अमित मालवीय यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राशीद अल्वी जय श्रीराम म्हणणाऱयांना निशाचर (राक्षस) म्हणत आहेत. राम भक्तांबद्दल काँग्रेसच्या विचारांमध्ये किती विष मिसळलं आहे, असं मालवीय म्हणाले आहेत.

राशीद अल्वींच्या या विधानावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही आक्षेप घेतला आहे. ‘रामावरून राजकारण केलं जाऊ नये. रामाच्या अनुयायांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. लोक याचं सडेतोड उत्तर देतील. राम भक्तांविषयी केलेली अशी विधानं चुकीची आहेत’ असं ते म्हणाले