झटपट श्रीमंत होण्याचे नामी उपाय !

2098

लक्ष्मीमातेची कृपा सगळ्यांनाच हवीशी… त्यासाठी अनेकजण दैवी उपाय, जपजाप्य, उपासना करत असतात पण खरोखर असे कोणते मार्ग आहेत जेणेकरून लक्ष्मी आईचा कृपाशीर्वाद सदोदित आपल्यावर राहील…

 • पैसे कमवा…पैसे गुंतवा….प्रॉपर्टी, शेअर्स, बॉण्ड्स, स्टार्ट अप फंडिंग सारख्या विविध मार्गंनी गुंतवणूक करा. गुंतवलेल्या पैशातून परतावा मिळवा, आलेल्या परताव्यातून 70 टक्के पैसा पुन्हा गुंतवा हे चक्र असेच चालू ठेवा…दहा वर्षांत तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल.
 • प्रत्येक महिन्याला उत्पन्नाच्या किमान दहा टक्के रकमेचे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घ्या.
 • एकाच व्यवसायातून शंभर रुपये कमावणे अवघड आहे, पण दहा व्यवसायातून दहा-दहा रुपये कमावणे सोपे. उत्पन्नाचे जास्तीत जास्त स्रोत तयार करा.
 • श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाचीही जोड हवी. नुसत्या कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असला असता.
 • पैसा कमावण्याचा जो कायम विचार करतो, पैसा वाढवण्यासाठी नियोजन करतो, नियोजनबद्ध, गुंतवणूक करतो तो श्रीमंत होतो. पैसा वाचवण्याचा जो फक्त विचार करतो तो गरीब होत जातो.
 • तुम्ही पैशासाठी काम करत असाल तर कदाचित सधन व्हाल, पण पैसा तुमच्यासाठी काम करत असेल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल. कायमस्वरूपी पैसा मिळत राहील असे उत्पन्नाचे स्रोत तयार करा.
 • पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावणे म्हणजे, पैसा अशा ठिकाणी गुंतवणे ज्यातून तुम्हाला कायमस्वरूपी उत्पन्न मिळत राहील, अगदी तुम्ही काम करत नसतानाही.
 • श्रीमंत व्हायचं असेल तर महिन्याच्या एकूण उत्पन्नातून खर्चाचे नियोजन असे असावे. 15 टक्के गाडी, घर इ.च्या कर्जाचे हफ्ते, 15टक्के घरखर्च मेंटेनन्स, लाईट बिल, किराणा इ., 15टक्के मौजमजा, प्रवास, मोबाईल बिल इ., 15टक्के नवीन खरेदी, इन्शुरन्स इ., 15 टक्के इतर, काही रोख रक्कम राखीव, टॅक्स इ., 30टक्के गुंतवणूक-शेअर्स, प्रॉपर्टी, म्यु.फंड्स इ., ही गुंतवणूकच तुम्हाला श्रीमंत बनवणार आहे हे लक्षात घ्या.
 • श्रीमंत लोक पैसा व्यवसायात, शेअर्समध्ये वा प्रॉपर्टीमध्ये गुंतवतात. गरीब लोक आपला पैसा श्रीमंती दाखवण्यासाठी खर्च करतात.
 • श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही तर पैशासोबत त्याचा उपभोग घेण्यासाठी पुरेसा वेळ असणे म्हणजे श्रीमंती.
 • तुम्ही जास्तीत जास्त तेवढेच श्रीमंत होऊ शकता जेवढं तुम्ही ठरवता.
 • पैसा सर्वस्व नाही हे वाक्य फक्त श्रीमंतांच्या तोंडी शोभतं, गरीबांच्या विरक्तीला अर्थ नसतो.
 • पैसा वाचवणे आणि पैसा वाढवणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत…वाचवलेला पैसा गुंतवला तर वाढतो आणि साठवला तर कुजतो.
 • श्रीमंत होऊन तुम्ही सुखी होऊ शकत नसाल, पण दुःखात असताना फुटपाथवर बसून रडण्यापेक्षा फेरारीमध्ये बसून रडणे कधीही बेटर ऑप्शन आहे.
आपली प्रतिक्रिया द्या