
>> शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट
सौंदर्य खुलविण्यासाठी सौंदर्य प्रसाधनं वापरताय… मग जाणून घेऊया त्याच्या योग्य पद्धती आणि वापर
सौंदर्य प्रसाधने ही सगळय़ांनाच खुणावत असतात मग ती स्त्री असो वा पुरुष… त्याला वयाचंही बंधन नसतं. सौंदर्य आकर्षक करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच चेहऱ्यातील आखीवरेखीव नसलेली गोष्ट शोधून काढून योग्य आकार देऊन त्यात उठावदारपणा आणण्याचे काम आता सौंदर्य प्रसाधनांमुळे शक्य झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
जनमानसात वावरताना आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणं खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच जसजसं वय वाढत जातं तसतसं स्त्र्ााr अथवा पुरुष आपलं व्यक्तिमत्त्व टिकवण्यासाठी जास्तच प्रयत्नशील असतात. प्रभावी व्यक्तिमत्त्व ही जरी सामाजिक गरज बनली असली तरी वाढतं वय आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असतं. आता मात्र नवनवीन संशोधनामुळे वाढत्या वयाततही प्रत्येकजण स्वतःचं व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवू शकतात, मात्र हे व्यक्तिमत्त्व टिकवण्यासाठी अधिक आकर्षक करण्यासाठी रंगीत प्रसाधनांचा वापर केला जातो हेही तेवढंच सत्य आहे.
व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध असणाऱ्या रंगीत प्रसाधनांकडे आकर्षित होतात. ही रंगीत प्रसाधनं वापरणं चुकीचं नसलं तरी त्यांचा उपयोग सफाईदारपणे व काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे असते. चुकीची प्रसाधनं वापरल्याने अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते तर काळजीपूर्वक विचार करून घेतलेली प्रसाधनं नेहमीच सौंदर्यात भर घालण्यास मदत करतात.
मेकअपच तंत्र खूपच बदललं आहे. त्यामुळे मेकअप करताना तो वेगवेगळय़ा पद्धतीने जास्तीत जास्त उठून कसा दिसेल याकडे लक्ष ठेवूनच करावा लागतो. प्रत्येकाचं राहणीमान, त्यांचा पोशाख, ते ज्या ठिकाणी वावरणार आहे ते ठिकाण या सगळय़ांचा विचार करूनच योग्य मेकअपच तंत्र वापरून मेकअप करावा लागतो. मेकअप करताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचंही भान राखावं लागतं. मेकअप हा चांगल्या मेकअप आर्टिस्टकडून करून घेणेच योग्य किंवा स्वतः त्याचा अभ्यास करून करणेच योग्य ठरेल.
मेकअप करताना त्यात नवनवीन बदल करीत राहणेही तेवढेच आवश्यक आहे. नाहीतर मेकअपचा तोचतोचपणा कंटाळवाणा ठरू शकतो. मेकअपची साधनं, साहित्य यांचा वापर आणि ती खरेदी करतानाची काळजी नेमकी कोणत्या प्रकारे घ्यावी तसेच कोणती साधनं आणि साहित्य मेकअपसाठी योग्य ठरतील याची माहिती लेखमालेतून घेणार आहोत. मेकअपच तंत्र शिकताना नेमकं काय करायचं, काय वापरायचं आणि नेमकं कधी वापरायचं या सगळय़ाचा सविस्तर लेखाजोखा आपण घेणार आहोतच, पण त्याचबरोबरीने इतरही अनेक विषयांना जाणून घेणार आहोत. मेकअपचं तंत्र आत्मसात केलत तर नक्कीच मेकअप करण्याची कला अगदी सोपी वाटू लागेल.



























































