मुंबईकरांची चिंता वाढली, दीड महिन्यानंतर दिवसभरात कोरोनाचे 117 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत नियंत्रणात असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाटय़ाने वाढू लागली असून गेल्या दीड महिन्यातील सर्वाधिक वाढ आज नोंदली गेली. मुंबईत आज दिवसभरात 117 रुग्ण सापडले तर एकाचाही मृत्यू झाला नाही. दरम्यान, आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 10 लाख 60 हजार 187 वर पोहोचली आहे.

मुंबई महापालिकेने कोरोनाच्या दुसऱया लाटेवर नियंत्रण मिळवले असताना फेब्रुवारी मध्यापासून 2022 पासून तिसऱया लाटेला सुरुवात झाली. मात्र या लाटेवरही मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने एकत्रित प्रयत्नांनी नियंत्रण मिळवले. मात्र मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून गेल्या दीड महिन्यातील सर्वाधिक वाढ आज झाली. या आधी एप्रिल 26 आणि 27 ला कोरोनाचे शंभरहून अधिक रुग्ण सापडले होते. दरम्यान, कोरोना मृत्यू आणि रुग्णालयात भरती होणाऱयांवर मुंबई महापालिकेने नियंत्रण मिळवले आहे.