
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खेड शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. चिपळूणला पुराचा धोका निर्माण झाला असून शहरातील बाजारपूलावर पुराचे पाणी आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १०९ मिमी पाऊस पडला. मंडणगड -१३२.२५ मिमी, दापोली १४९.४२ मिमी,खेड – १२५.४२ मिमी, चिपळूण – ७२ मिमी,गुहागर – १३०.७७ मिमी, संगमेश्वर – ७९.९१ मिमी, रत्नागिरी – ५२.७७ मिमी, लांजा – ८७.८० मिमी, राजापूर – १५५ मिमी पाऊस पडला.
खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पुराचे पाणी खेड बाजारपेठेत शिरले आहे.बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. वशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.चिपळूण शहरातील बाजारपूलावर पुराचे पाणी आल्याने चिपळूण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






























































