बीडच्या मांजरसुबा घाटात ट्राफिक जाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीडपासून काही अंतरावरील असणाऱ्या मांजरसुबा घाटात शुक्रवारी सकाळी एक ट्रक पुलाच्या भिंतीला धडक देउन रस्त्यावर आडवा झाला. या अपघातामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे प्रवाशाचे मोठे हाल झाले.

बीडपासून जवळपास दहा कीलोमीटर अंतरावर असणाऱ्या मांजरसुबा घाटात नव्या पूलाचे काम सुरु आहे. चालकाचा ताबा सूटल्याने एक ट्रक पुलाच्या भिंतीला येऊन धडकून मुख्य रस्त्यावर आडवा झाला आहे. त्यामुळे मांजरसुबा घाटातील वाहतूक बंद आहे. दोन्ही बाजूने निर्माण झालेली वाहतूक कोंडी सूरळीत होण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.