कपाळावर डास चावल्याने प्रशिक्षणार्थी पायलटचा मृत्यू

कपाळावर डास चावल्याने एका प्रशिक्षणार्थी पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डास चावल्याने संसर्ग झाला आणि तो या पायलटच्या मेंदूपर्यंत पसरला होता. ओरियाना पेपर (21 वर्षे ) असं या पालयटचं नाव आहे. ओरियाना बेल्जियममधील अँटवर्प इथे गेली असताना तिला डास चावला होता. उजव्या भुवईच्या वर तिला हा डास चावला होता आणि डास चावल्याने तिच्या भुवईवरचा भाग सुजलाही होता.

7 जुलै 2021 रोजी ओरियाना डॉक्टरकडे गेली होती. डॉक्टरांनी तिला काही औषधे घेऊन घरी पाठवले होते. दोन दिवसांनी ओरियाना घरी बेशुद्ध होऊन कोसळली होती ज्यामुळे तिचा प्रियकर जेम्स तिला परत हॉस्पीटलमध्ये घेऊन आला होता. 12 जुलै 2021 रोजी ओरियानाचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूचे कारण समजावे यासाठी चौकशी नेमण्यात आली होती. निगेल पार्सली तिच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचे काम करत होते. त्यांना सादर केलेल्या निष्कर्षांमध्ये ओरियानाचा मृत्यू हा डास चावल्यानेच झाल्याचे नमूद केले आहे.

डास चावल्याने ओरियानाला संसर्गबाधा झाली होती. तिच्या मेंदूतील रक्तपुरवठा करणाऱ्या नसांवर संसर्गाचा परिणाम झाला होता. यामुळे तिची प्रकृती खालावत हेली होती. असा प्रकारची घटना आपण यापूर्वी कधीही पाहिली नव्हती असं पार्सली यांनी म्हटलं आहे.